top of page
Bhishma School of Indic Studies.png

Bhishma Sanatan Vedic Hindu University

Untitled-2.jpg

◼️ कालावधी : 26 जानेवारी ते 25 मे, 2025

◼️ दर शनिवारी रविवारी - प्रत्येकी दीड तास

◼️ वयोमर्यादा: स्त्री / पुरुष / 12 वर्षांवरील मुले मुली

◼️ सर्वांना मुक्त प्रवेश...

◼️ माध्यम : मराठी with इंग्रजी

◼️ मराठी (80%) + इंग्रजी (20%) 

◼️ स्टडी मटेरिअल : मराठी

◼️ नोंदणीची अखेरची तारीख :  20 जानेवारी 2025

षोडशोपचार पूजा पद्धती आणि पौरोहित्य परिचय ऑनलाईन अभ्यासक्रम
भारतीय समाज पिढ्यानपिढ्या धार्मिक प्रवृत्तीचा आहे. भारतीय जीवन परंपरेचा पाया म्हणजे सनातन वैदिक संस्कार आणि संस्कृती आहे. देवतापूजन, उपासना आणि पूजा पद्धती हा एकूणच भारतीय माणसाचा स्थायीभाव आहे. दैनंदिन पूजा तसेच नैमित्तिक पूजा हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी आणि काही कुटुंबांमध्ये आजही दैनंदिन पूजन हा दिनचर्येचा एक अविभाज्य भाग आहे. भारतीय मानस मुळातच श्रद्धाळू आणि आस्तिक मनोवृत्तींचे आहे. पृथ्वीवर आपले वास्तव्य असताना सर्व प्रकारच्या अधिभौतिक आणि अधिदैविक शक्तींची आपल्यावर कृपा असावी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि आपले जीवन सुखमय, आनंदमय आणि चैतन्यमय व्हावे अशी धारणा आहे. देवतांची पूजा आणि उपासना मनाला, बुद्धीला आणि चित्ताला अपार आनंद देणारा अनुभव आहे. त्यातून होणारे एका प्रकारचे ध्यान आणि पूजेमध्ये रममाण होणे हा अत्युच्च आनंद आहे. वैयक्तिक पूजा आणि सामूहिक पूजा पारंपरिक पद्धतीमध्ये विकसित होत गेल्या. त्यातूनच पूजा आणि उपासना तंत्रातील तज्न अशा पुरोहित किंवा भटजी यांच्या सहकार्याने वैयक्तिक यजमान म्हणून आपल्या घरांमध्ये तसेच सामूहिक पूजा करण्याची परंपरा निर्माण झाली. वेदपाठशाळेतून खडतर प्रशिक्षण घेतलेले पुरोहित यांनी ही परंपरा पुढे विकसित केली जी आजही निरंतर सुरु आहे.


आज भारतीयांनी विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. सातासमुद्रापलीकडे म्हणजे अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदि खंडांमध्ये त्यांनी वास्तव्य केलेले आहे. काळाच्या या प्रवाहामध्ये गतिमान जीवनपद्धतीमुळे दैनंदिन पूजा आणि उपासना यांची आपली थोडी फारकत झाली आहे. विशेषत अमेरिकेसारख्या देशामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्य करून असलेल्या मराठी बांधवांना याची निकड जाणवत आहे. सत्यनारायण पूजा, वास्तुशांत, विवाह, ग्रहयज्ञ, नक्षत्रशांती इ. साठी मराठी पुरोहित मिळणे थोडे अवघड झाले आहे.
भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी ऑनलाईन पौरोहित्य अभ्यासक्रम सुरु करण्याचे ठरवले आहे. प्रख्यात विदुषी, व्यासंगी प्रवचनकार आदरणीय कल्याणीताई नामजोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम तयार केला आहे. प. पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास, अयोध्या यांचे आशीर्वाद या उपक्रमासाठी लाभले आहेत. अमेरिकेतील सुप्रसिद्ध कीर्तनकार सी. रश्मीताई बर्वे आणि त्यांचे यजमान श्री. नितीन बर्वे यासाठी समन्वयाचे काम पाहणार आहेत. ऑनलाईन पौरोहित्य अभ्यासक्रम एकूण दोन स्तरावर चालणार आहे. १) परिचय स्तर २) प्रविण स्तर. हा अभ्यासक्रम पुराणोक्त पद्धतीवर आधारित आहे.

🟦अभ्यासक्रमात प्रवेश का घ्यावा ?
☑️ घरच्या घरी पूजा करता येईल
☑️ समांतर करिअर विकसित करायची संधी
☑️ लहान वयातच आध्यात्मिक संस्कार पौरोहित्य
☑️ करिअर म्हणून अमेरिकेमध्ये मोठी संधी.
☑️ संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धक म्हणून सामाजिक प्रतिष्ठा
☑️ संस्कृत भाषा, पाठांतर, स्तोत्रपठण, अग्निहोत्र यामुळे आगळ्यावेगळ्या आनंदाची अनुभूती
☑️ मंदिरे, धार्मिक सामाजिक क्षेत्रे इ. ठिकाणी नोकरीची संधी

परिचय स्तर पूर्ण केल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना कोणती कौशल्ये प्राप्त होतील ?

✅ स्तोत्रांचे आणि मंत्रांचे उच्चार यांचे प्राथमिक ज्ञान होईल.

✅ पूजा आणि उपासना पद्धती यांची माहिती होईल.
✅ पूजेची तयारी कशी करावी, संकल्प कसा करावा आणि पूजा साहित्य कोणते यांची कौशल्ये प्राप्त होतील.
✅ विविध देवतांची ओळख व माहिती होईल आणि ती सांगता येईल.
✅ विविध स्तोत्रे आणि श्लोक यांचे पाठांतर होईल आणि गोषवारा माहीत होईल.
✅ षोडशोपचार पूजा पद्धतीची माहिती होईल, प्रत्यक्ष षोडशोपचार पूजा करता येईल (सोळा उपचार पूजा).
✅ रोज घरची पूजा करता येईल.
✅ गणेशोत्सवामध्ये गणपती, गौरी प्रतिष्ठापना करता येईल.
✅ घटस्थापना करता येईल, सरस्वती पूजन करता येईल.
✅ विविध व्रते, सण, उपासना यांची माहिती होईल, नामस्मरण करता येईल.
✅ आपल्या स्वतच्या तसेच यजमानांच्या घरी पूजा करता येतील. इ.
✅ धार्मिक विधीबाबत मार्गदर्शन करता येईल, प्रबोधन करता येईल, व्याख्यान देता येईल.

✅ अमेरिकेतील Certified पुरोहित म्हणून प्रोफेशन करता येईल.

🟪 अभ्यासक्रम शुल्क :
☑️ परिचय स्तरः Invitation Fees - USD 450/-
☑️ ऑनलाईन मार्गदर्शन। ऑनलाईन परिक्षा
☑️ प्रत्येकाला प्रमाणपत्र। मर्यादित जागा। ऑनलाईन प्रवेश घ्या
☑️ Zelle Code: payment@bhishmasanatan.university

Contact for any inquiries -
Call / WhatsApp :

+1-6503151128 | +1-6508105252
namaste@bhishmasanatan.university

Regi. Address:
2 N Central Avenue Suite 1800
Phoenix AZ 85004 USA

🟥 अभ्यासक्रम नियम :
◾ या अभ्यासक्रमातील सर्व सत्रे ऑनलाईन झुम मिटिंग द्वारे आयोजित केली जाणार आहेत. 
◾ दिलेल्या वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक तसेच मार्गदर्शकांकडे आहेत.
◾ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही तसेच भरलेली रक्कम परत करता येणार नाही
◾ संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक इ. वाचल्यानंतरच नोंदणी करावी,
◾ एकूण अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरीयल ई-बुक स्वरुपात दिले जाईल.

आचार्य : डॉ. माधव गजानन केळकर

व्यवसायाने पुरोहित, पुण्यात वास्तव्य.शिक्षण - वेदाध्ययन याज्ञिक वे. मू. दिनकर फडके गुरुजीकडे.शिक्षण- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून संस्कृत विषयात विद्यावाचस्पती (पी एच डी),विषय-गृह्यसंस्कारप्रायश्चित्तानि, शोधकार्य वेदमंत्र पादसूची या शोध प्रकल्पात संशोधन सहाय्यक.पुरस्कार - महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार (२०१७), महाराष्ट्र, सेवा संघाचा संस्कृत सेवा पुरस्कार (२०१६), काण्व पाठशाळेचा वेद प्रसार पुरस्कार (२०२२)संस्कृतभारती या सेवाभावी संस्थेचे १९९० पासून विविध स्तरावर काम, त्या निमित्त देशभरात प्रवास, सध्या पश्चिम मध्य क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र या दोन क्षेत्रांचा विद्यालयीन शिक्षा प्रमुख, विविध चर्चा सत्रात शोध निबंध वाचन, चर्चा सत्रात परीक्षक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती, पाठ्यक्रम तज्ञ

bottom of page